फैजपूरातील गुरूजींना लाखांचा गंडा : भामटा पोलिसांच्या जाळ्यात
यावल : फैजपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण गणपत नेमाडे यांना 24 फेब्रुवारी रोजी अज्ञाताने गुरूजी मी तुम्हाला ओळखतो, असे सांगत एक लाखात गंडवले होते. या प्रकरणी आरोपी इब्राहीम उर्फ टिपू सत्तार मन्यार (वराडसीम, ता.भुसावळ) यास अटक करण्यात आली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मागर्र्दर्शनाखाली फौजदार मकसुद्दीन शेख आदी करीत आहेत.


