भरधाव कारची दुचाकीला धडक : वयोवृद्ध जखमी
जळगाव : शहरातील कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक जण जखमी झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भरधाव ट्रकच्या धडकेत मोहाडीतील 13 वर्षीय बालकाचा मृत्यू
वयोवृद्ध अपघातात जखमी
गणपती नगरातील किराणा व्यावसायीक प्रकाश भिला वाणी (64) हे 17 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा अमित वाणी याच्यासोबत त्यांच्या (एम.एच.19 बी.एफ.1599) क्रमांकाच्या दुचाकीवरून गावात आले होते. काम आटोपल्यावर घरी चित्रा चौकातून शिवाजी महाराज पुतळ्याकडे जात असताना भोरटके झेरॉक्स सेंटरसमोर त्यांच्या दुचाकीला भरधाव चारचाकी (एम.एच.19.ए.पी.2448) ने जोरदार धडक दिल्याने प्रकाश वाणी यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. उपचारानंतर प्रकाश वाणी यांनी मंगळवारी दिलेल्या तक्रारीवरून कारचालक प्रकाश कापसे (पिंप्राळा) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार संजय बडगुजर हे करीत आहेत.




