NCP Leader Rupali Chakankar राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांचा राजीनामा
NCP Leader Rupali Chakankar पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांना पाठवण्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पद असल्याने त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. चाकणकर यांच्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला ंधी देणार? याकडे लक्ष लागले आहे.
चित्रा वाघ यांच्या जागी मिळाली होती संधी
चाकणकर (NCP Leader Rupali Chakankar) या पुण्याच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. त्यानंतर त्यांना प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा म्हणून संधी मिळाली. राज्यात 2019 च्या विधासभा निवडणुकीच्या वेळी महिला राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा दिल्यानं त्या जागी रुपाली चाकणकर यांना संधी मिळाली.


दौंडच्या रहिवासी
रुपाली चाकणकर (NCP Leader Rupali Chakankar) या दौंडच्या असून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. अधिकारी होण्याची इच्छा असल्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही केला. पण त्यात फारसं यश मिळालं नाही. लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबात आल्या. रुपाली चाकणकर यांना माहेरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही पण चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी होती. रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यांच्या माध्यमातून रूपाली चाकणकर यांचा राजकारणाशी संबंध येऊ लागला.
शरद पवारांनी सोपवली होती जवाबदारी
2002 पासून पुढची 5-6 वर्षं रुपाली चाकणकर यांनी परिसरातील महिला बचतगटासाठी काम केलं. पुढे चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं. तिथून रूपाली चाकणकरांच्या (NCP Leader Rupali Chakankar) राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. रुपाली चाकणकर यांचा आक्रमक पवित्रा पाहता त्यांची पुणे शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर 2019 ला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अचानक भाजपात प्रवेश करून धक्का दिला. तेव्हा रुपाली चाकणकर (NCP Leader Rupali Chakankar) यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.


