‘पोकरा’ योजनेत मुक्ताईनगरसह बोदवड व रावेर तालुक्यातील 95 गावांचा समावेश व्हावा

आमदार चंद्रकांत पाटील यांची राज्याचे कृषी मंत्री दादा भुसेंकडे मागणी : दखल घेण्याचे आश्वासन


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदार संघातील टंचाईग्रस्त, दुर्गम व कोरडवाहू क्षेत्रातील असून सदरील शेतकर्‍यांचे कृषी व कृषी पूरक व्यवसाय हे उपजिवीकेचे साधन आहे. पोकरा प्रकल्प हा निश्चितच शाश्वत शेती व हवामान अनुकूल पीक पद्धतीवर प्रकल्प असून या प्रकल्पातून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना भविष्यकाळात शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याने या प्रकल्पात मुक्ताईनगरसह बोदवड व रावेर तालुक्यातील 95 गावांचा समावेश करण्याची मागणी कृषी मंत्र्यांकडे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या संदर्भात दखल घेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

निकषात गावे बसत नसल्याने दिले पत्र
पोकरा प्रकल्पाच्या निकषात मतदार संघातील मुक्ताईनगर तालुक्यातील 21 गावे, बोदवड तालुक्यातील 37 गावे आणि रावेर तालुक्यातील 39 गावे बसलेली नाहीत. याकरिता जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर 19 गावे, बोदवड 37 गावे व रावेर 39 गावे एकूण 95 गावांचा समावेश करण्यात यावा अशा मागणीचे पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना दिले. यावेळी कृषी मंत्री भुसे यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबधित विभागाला दिल्या.



या गावांचा व्हावा समावेश
पोकरा प्रकल्पात मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर, वढवे, कासारखेडा, निमखेडी खुर्द, माळेगाव, सातोड, चारठाणा, मोरझिरा, मधापुरी, धामणगाव, बोदवड, काकोडा, बोरखेडा, राजुरे, धाबे, रामगड, कोठे, लोहारखेडा, पिंप्रीभोजना, कर्की, पिंप्रीअकराऊत या 21 गावांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली तर बोदवड तालुक्यातील बोदवडसह मनुर खुर्द, मनुर बु.॥, नाडगाव , सोनोटी, जुनोने, आमदगाव, शिरसाळे, कोल्हाडी, हिंगणे, चिंचखेडासीम, एणगाव, निमखेड, वरखेड बु.॥ वरखेड खुर्द, राजूर, नांदगाव. पळासखेडा खुर्द, हरणखेड, चिखली बु॥, वडजी, चिंचखेड प्र.बो., शेवगे बु., घाणखेड, कुर्‍हे हरदो, शेवगे खुर्द, धोंडखेडा, साळशिंगी, भानखेडा, सुरवाडे बु.॥, सुरवाडे खुर्द, मानमोडी, विचवे, गोळेगाव बु.॥, गोळेगाव खुर्द, करंजी व पाचदेवळी या 37 गावांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तर रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा
पोकरा योजनेत रावेर तालुक्यातील 39 गावांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. तयात मस्कावद बु.॥, मस्कावद खु., मस्कावदसीम, वाघोदे खुर्द, मांगी, सावदा, तांदलवाडी, बलवाडी, मांगलवाडी, सिंगत, सुनोदे, थोरगव्हाण, गाते, उदळी बु.॥, लुमखेडा, बोरखेडासीम, कोचुर बु.॥, कोचुर खु.॥, वाघोदा बु.॥. दसनूर, सिंगनुर, आंदलवाडी, ऐनपूर, निंबोल, धामोडी, कांडवेल, कोळोदा, सिंगाडी, सुलवाडी, वाघाडी, खिर्डी बु.॥, खिर्डी खुर्द, गोलवाडे, भामलवाडी, पुरी, रेंभोटे, चुनवाडे, विटवे व सांगवे या गावांचा समावेश आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !