भुसावळात महिला वकीलावरील हल्याचा निषेध

प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन दोषीवर कठोर कारवाईची भुसावळ वकील संघाची मागणी


भुसावळ : वर्धा येथील न्यायालयात न्यायालयाच्या कक्षात एका संशयीताने महिला वकील योगीता मुन यांच्यावर न्यायाधीशांसमोर चाकूचे वार केला हाता. या घटनेचा भुसावळ येथील वकील संघातर्फे निषेध करण्यात आला. प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.

दोषीवर कठोर कारवाईची मागणी
वर्धा येथील न्यायालयात न्यायाधीश आशुतोष करमरकर यांच्या दालनात कामकाज सुरू असतांनाच भीम गोविंद पाटील या संशयीताने अ‍ॅड मुन यायच्यावर चाकूने वार केला. हा हल्ला न्यायाधीश करमरकर यांच्यासमोर झाला. या हल्ल्यामुळे अ‍ॅड.मुन यांची प्रकृती गंभीर झाली आहे. संशयीत पाटील यांने अ‍ॅड.मुन यांना तु माझ्या विरोधात खटला का चालविते असे म्हणत यापूर्वीही हल्ला केला होता व पुन्हा हल्ला करण्यात आला. वकीलांवर होणारे भ्याड हल्ले रोखण्यासाठी अ‍ॅडव्होकेट प्रोटेक्शन अ‍ॅक्ट हा कायदा मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी वकील संघातर्फे करण्यात आली. अ‍ॅड. मुन यांच्यावर केलेल्या भ्याड हल्याचा निषेध करीत संशयीताला जामीन मिळू नये, हा खटला जलद न्यायालयात चालवावा अशी मागणी वकीलांनी केली.



कंडारीच्या इसमाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर वकील संघंचे अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड.धनराज मगर, अ‍ॅड.जास्वंदी भंडारी, सहसचिव पी.आर.पाटील, अ‍ॅड.विजय तायडे आदींच्या सह्या आहेत, निवेदन देतांना अ‍ॅड. राजेश उपाध्याय, अ‍ॅड. सुचेता भैसवाल, अ‍ॅड. कल्पना टेमाणी, अ‍ॅड.महेश चौधरी, अ‍ॅड.विनोद तायडे, उमेश पाटील, अ‍ॅड. शुभम गोसावी, अ‍ॅड.धीरज शंकपाळ, अ‍ॅड.मनिष अहिरे आदी उपस्थित होते.

गोव्यातील समुद्रात बुडाल्याने भुसावळातील तरुणाचा मृत्यू





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !