बीडगाव शिवारात बनावट दुधातील भेसळीचा काळाबाजार उघड : 12 लाखांच्या मुद्देमालासह तिघे जाळ्यात

नाशिक आयजींच्या पथकासह गुन्हे शाखा व अडावद पोलिसांची कारवाई : अडावद पोलिसात गुन्हा दाखल


भुसावळ : चोपडा तालुक्यातील बीडगाव शिवारातील बीडगाव-कुंड्यापाणी रस्त्यावर भेसळीच्या बनावट दुधाचा काळाबाजार उघड करण्यात नाशिक आयजींच्या विशेष पथकासह जळगाव गुन्हे शाखा व अडावद पोलिसांना यश आले आहे. पथकाने टाकलेल्या छाप्यात 11 लाख 18 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात यंत्रणेला यश आले आहे तर एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला आहे.

तिघे आरोपी जाळ्यात : एक पसार
बीडगाव, ता.चोपडा शिवारातील बीडगाव-कुंड्यापाणी रोड लगत शेतात लक्ष्मण देवा भरवाड (पळासनेर, जि.धुळे) हा त्याच्या हस्तकामार्फत खाद्यतेल व दुध पावडरची मिश्रण करून भेसळीचे दुध विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागासह जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व आयजींच्या विशेष पथकासह अडावद पोलिसांच्या पथकाने धाड टाकत तिघांच्या मुसक्या आवळल्या तर एक संशयीत पसार होण्यात यशस्वी झाला. पथकाने दोन पिकअसह एक दुचाकी, चार मोबाईल, 56 दुधाचे कॅन, पाच तेलाने भरलेले डबे, 20 किलो अमूल दूध पावडर, इन्व्हर्टर, बॅटरी, तीन बादल्यांसह अन्य साहित्य मिळून 11 लाख 18 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच मुद्देमालाचे नमूने घेवून नाशवंत माल जागीच नष्ट करण्यात आला. चौघा आरोपींविरोधात अडावद पोलिसात भादंवि 328, 272, 273, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !