कारमधून आलेल्या टोळक्याकडून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ल्ला
नाशिक : आनंदवली भागात कारमधून आलेल्या टोळक्याने एका तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. किरण राजेंद्र जाधव (26 रा.शिवनगर, आनंदवली) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी पंकज उर्फ पप्पू मुरलीधर नरया पवडे (32), रूपेश भिमराव ताजणे (24) व सचिन बळीराम म्हस्के (22 रा. भोसला मागे,संतकबीरनगर झोपडपट्टी) अशी संशयित हल्लेखोरांची नावे असून पप्पू नरवडे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. जाधव बुधवारी रात्री आनंदवली गावातील मारूती मंदिराकडून शिवनगरकडे पायी जात असतांना चांदशी कडून भरधाव आलेल्या कार मधील संशयितांच्या टोळक्याने हा हल्ला केला. जाधव यांच्यासमोर कार उभी करून नरवडे याने जाधव यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला तर उर्वरीत साथीदारांनी त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास हवालदार झाडे करीत आहेत.



