साहित्यरत्न आण्णा भाऊसाठे विकास महामंडळाचा लाचखोर शिपाई एसीबीच्या जाळ्यात
Nashik ACB Trap नाशिक : साहित्यरत्न आण्णा भाऊसाठे विकास महामंडळातील कंत्राटी अस्थायी शिपाई दत्ता मारोती घोडे यास तीन हजार रुपयांची लाच घेताना नाशिक एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक करण्यात आली.
पाचोर्यातील लाचखोर कृषी सहाय्यक जळगाव एसीबीच्या जाळ्यात
तीन हजारांची लाच भोवली
तक्रारदार यांचा मुलगा सुशिक्षित बेरोजगार असून त्याने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, नाशिक येथे छोटा हत्ती खरेदीसाठी चार लाख 71 हजार 401 रुपयांचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला असल्यामुळे आरोपी खाजगी इसम याने शासकीय कार्यालयातील त्याच्या ओळखीचा व त्याच्या नावाचा तक्रारदार यांना प्रभाव दाखवून तीन हजारांची लाच 23 रोजी मागितली होती व सापळा रचल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलिस निरीक्षक साधना इंगळे, सचिन गोसावी, राजू गिते, शरद हेंबाडे, चालक संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
चार लाखांचे लाच प्रकरण : अक्कलकुवा जि.प.तील.लाचखोर अभियंत्यांसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी


