बहुजन जागृती मंचतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा


भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त बहुजन जागृती मंच भुसावळतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. विषय निवडीचे स्वातंत्र्य स्पर्धकांना आहे.

पाच गटांसाठी होणार स्पर्धा
पहिला गट पहिली ते चौथी, वेळ दोन मिनिटे, दुसरा गट तिसरी ते चौथी, वेळ तीन मिनिटे, तिसरा गट पाचवी ते आठवी, वेळ चार मिनिटे, चौथा गट, नववी ते बारावी, वेळ पाच मिनिटे आणि पाचवा गट खुला (मोठ्या वयोगटासाठी) वेळ सात मिनिटे असणार आहे. स्पर्धकाने आपल्या वक्तृत्वाचा व्हिडिओ हा बहुजन जागृती मंचच्या ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर वकृत्व स्पर्धा 2021’ या फेसबुक ग्रुपवर अपलोड करायचा आहे. व्हिडिओ अपलोड करण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल 2022 अशी आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम फेरी ऑफलाइन घेण्यात येईल. त्याच दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रमदेखील होईल.

स्पर्धेत सहभागाचे आवाहन
स्पर्धेत सहभागासाठी गटप्रमुख सूर्यकांत घुले, अजय चालसे, प्रमोद खैरे, रुपेश मेश्राम, समाधान जाधव, कमलेश शामकुवर, देव सरकटे, शैलेंद्र महाजन, धम्मरत्न चोपडे, दीपक इंगळे यांच्याशी संपर्क करावा. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 9850211339 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन बहुजन जागृती मंचतर्फे करण्यात आलेले आहे. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आयोजन व नियोजन समितीतील सर्व सदस्य परीश्रम घेत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !