भुसावळातील पापा नगरात घराला आग ; संसारोपयोगी वस्तू जळाल्याने दोन लाखांचे नुकसान


भुसावळ : शहरातील पापा नगरातील घराला अचानक आग (A house caught fire in Papa Nagar, Bhusawal) लागल्याने संसारोपयोगी वस्तूंसह घर सामान मिळून एक लाख 97 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

अ‍ॅपे रीक्षातून पडल्याने शेलवडच्या विद्यार्थिनीचा मृत्यू 

बाजारपेठ पोलिसात अकस्मात आगीची नोंद
नाजेराबी शेख अय्युब (50, रा.उस्मानिया नक्षाबंदी, पापा नगर, भुसावळ) यांच्या घराला बुधवार 23 मार्च रोजी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याने खळबळ उडाली होती. यावेळी नागरीकांनी घरातील पाणी न मिळाल्याने त्यांनी नाल्याच्या पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आग आग एवढी मोठी होती की, घरातील संसारोपयोगी वस्तू आणि इतर महत्वाच्या वास्तू मिळून एक लाख 97 हजारांचा सामान जळून खाक झाला. दरम्यान, भुसावळ नगरपालिकेचा अग्निशमन बंब एक तास उशिराने घटनास्थळी दाखल झाल्याने येथील नागरीकांनी संताप व्यक्त केला. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू यांनी देखील मदत कार्य केले. या प्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार सत्तार शेख करीत आहे.

नंदुरबारजवळ ट्राला-चारचाकीत भीषण अपघात : तिघे ठार





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !