एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेसला दोन एसी डब्यांची वाढ


भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई-कामाख्या वातानुकूलीत एक्स्प्रेस या गाडीला कायमस्वरूपी दोन एसी डब्यांची वाढ करण्यात आली आहे.

वाढती गर्दी लक्षात घेता दोन एसी डब्यांची वाढ
लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या वातानुकूलीत एक्स्प्रेसला दोन तृतीय वातानुकूलित डबे कायमस्वरूपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हे डबे 12519 व 12520 लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या एक्स्प्रेस या गाडीला प्रवाशांची वाढती गर्दी घेता वाढवण्यात आले आहे.

प्रवाशांना मिळणार आता अधिक सुविधा
लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या एसी एक्सप्रेसला 3 एप्रिलपासून आणि कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस एसी एक्सप्रेसला गुरुवार, 31 मार्चपासून हे डबे जोडले जाणार आहे. या गाडीस एक प्रथम वातानुकूलित, चार द्वितीय वातानुकूलित, 14 तृतीय वातानुकूलित एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर कम गार्ड ब्रेक व्हॅन असे डबे असतील, यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !