विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातून जळगावातील तरुणाचा खून : आरोपी पतीला अटक


Jalgaon Murder जळगाव : शहरातील समता नगर भागातील रहिवासी असणार्‍या 28 वर्षीय तरुणाचा विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून चाकूहल्ला करून खून (Murder) करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत सागर नरेंद्र पवार (28) या तरुणाचा मृत्यू झाला तर संशयीत आरोपी अमित नारायण खरे यास रामानंद नगर पोलिसांनी अटक करीत त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयातून केला खून
शहरातील समता नगर भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार (28) हा तरुण एकटाच वास्तव्यास होता. शुक्रवारी रात्री उशीरा त्याच्यावर संशयीत आरोपी अमित नारायण खरे (33) याने चाकूचे मानेवर सपासप वार केले. अमितला आपल्या पत्नीचे मयत सागरशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता व त्यातूनच हा खून घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, चाकू हल्ल्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या सागरला परीसरातील नागरीकांनी तातडीने रुग्णालयात हलविले. येथे उपचार सुरू असतांना शनिवारी सकाळी पाच वाजता त्याने शेवटचा श्वास घेतला.

आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
अमितच्या मृतदेहावर जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन (pm) करण्यात आले. यावेळी मयत तरुणाच्या आप्तांनी आक्रोश केल्यानेे वातावरण गंभीर बनले होते. दरम्यान, खून प्रकरणी किरण दादाराव अडकमोल (30, समता नगर, जळगाव) यांनी रामानंद नगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी अमित नारायण खरे विरोधात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !