धुळे तालुका पोलिसांनी 25 लाखांची रोकड ट्रकमधून केली जप्त

रक्कम हवाल्याची असल्याचा संशय : आयकर विभागाशी पत्रव्यवहार


धुळे : धुळे तालुका पोलिसांनी ट्रकमधून मालेगावहून सुरतमध्ये नेण्यात येणारी सुमारे 25 लाखांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. ही रक्कम हवाल्याची असल्याचा संशय असून त्या दृष्टीने आयकर विभागाशी पत्रव्यवहार केला जात आहे. धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारात शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातून जळगावातील तरुणाचा खून : आरोपी पतीला अटक

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे तालुक्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना ट्रकमधून रोकड नेली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने शनिवारी मध्यरात्री कुसुंबा उड्डाणपुलाखाली सापळा रचला. यावेळी कुसुंबामार्गे सुरतकडे जाणारा ट्रक (क्र.एम.एच.17 ए.जी.0592) ची तपासणी केल्यानंतर त्यात कॅबीनमध्ये रोकड आढळली. ट्रक चालक शेख शफीक शेख अहमद (57, रा.गुलशेर नगर, मालेगाव) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने ही रक्कम मालेगावच्या विजयभाई बाबुभाई पटेल यांची असल्याचे सांगत ती सुरत येथे देण्यात येणार असल्याची माहिती दिली. ट्रकसह चालकाला पोलिसांनी अधिक कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार प्रवीण पाटील, प्रमोद ईशी, नंदु चव्हाण, प्रकाश भावसार, कुणाल शिंगाणे, राकेश मोरे, कांतीलाल शिरसाठ, रवींद्र राजपुत, निलेश पाटील यांच्या पथकाने केली.

धडगाव बसस्थानकात प्रेम प्रकरणातून युवकाची गळफास घेवून आत्महत्या 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !