माजी मंत्री खडसे वैफल्यग्रस्त : पराभव पचलेला नाही -आमदार चंद्रकांत पाटील
मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांनी शनिवारी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांना परखडपणे उत्तर देताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी आमदार झाल्याचे खडसे यांना अद्यापही रूचलेले नाही, ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.
30 वर्ष सत्तेत असताना मग का नाही केला विकास?
आमदार चंद्रकांत पाटील (Mla Chandrakant Patil) म्हणाले की, महाशिवरात्रीला मुक्ताई मंदिरात पुजेसाठी गेलो असता भाविकांनी मंदिर जीर्णोद्धाराचे काम गेल्या दिड वर्षापासुन बंद असल्याचे सांगितल्याने आठ दिवसात निधी मिळवून देतो, असा शब्द भाविकांना दिला होता. मंत्री आदित्य ठाकरे , हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार यांच्यासोबत बैठक घेतली. या कामांसाठी शुक्रवारी पाच कोटींचा निधी मिळाला असून मंदिर परीसरात जनाबाईचा मठ, ड्रोम आमदार निधीतून दिलेले आहेत. 30 वर्ष खडसे यांना संधी होती मग का विकास झाला नाही. मंदीराजवळील जुनेगावाकडुन येणारा पुल मी मंजुर केला होता त्यातही खडसे म्हणताय ते काम मी केले. करंटे पणासारखे शब्द खडसेंसारख्या नेत्यांच्या तोंडून शोभत नाही. मुक्ताईनगर मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटीबद्ध आहे.

खडसेंना लगावला मार्मिक टोला
खडसे (Eknathrav Khadse) हे मविआचे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला किती मान आहे हे सर्वांना माहित आहे. कॅबीनेटची बैठक होण्याआधी त्यांना बहुतेक विचारले जात असावे ? असा मार्मिक टोला आमदार पाटील (Mla Chandrakant Patil) यांनी खडसेंना लगावला.
निधी परत जावू देण्याचा करंटेपणा करू नका : माजी मंत्री खडसे


