जळगावात हॉटेलमध्येही तोडफोड ; मद्यपीने पोलिस कर्मचार्‍याला मारला चाकू


जळगाव : हॉटेल बंद करण्याची वेळ झाल्यामुळे मालकाने वाढदिवसाची पार्टी साजरी करणार्‍या तरुणांना बिअर दिली नाही. त्यामुळे या मद्यधुंद तरुणांनी हॉटेलात तोडफोड करून मालकास चमचा मारला. त्यानंतर तेथे आलेल्या पोलिस कर्मचार्‍यास एकाने चाकू मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. शुक्रवारी रात्री 12.30 वाजता शिरसोली नाका परिसरातील हॉटेल गोल्डन नेस्ट येथे ही घटना घडली.

जळगावातील रीक्षा चालकाच्या खून प्रकरणी आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात 

चाकूहल्ल्यात पोलिस जखमी
जितेंद्र आत्माराम जाधव (22, रा.आशाबाबानगर) याने राजेश विलासराव भावसार (49) या पोलिस कर्मचार्‍यास चाकू मारला. जितेंद्र जाधवसह प्रवीण सोनार, गणेश रवींद्र साोनवणे, सागर सुधाकर कोळी (दोघे रा. जैनाबाद), सपना सागर कोळी, अण्णा राठोड, राम सोनवणे, पूजा प्रवीण अहिरे व इतर पाच ते सहा जण हे सर्व शुक्रवारी रात्री 9.45 वाजता सागर कोळीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेल गोल्डन नेस्ट येथे गेले होते. रात्री 12.30 वाजेची वेळ झाल्यामुळे वेटर कुणाल व कॅप्टन सम्राट यांनी बिअर देण्यास मनाई केली. यावेळी सर्वांनी दोघांना मारहाण करून हॉटेलात तोडफोड केली. भावसार व हॉटेल मालक राजकुुमार रावलानी यांनी स्वतंत्र फिर्याद दिल्याने मद्यधुंद तरुणांवर रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत जळगावातील दोघे तरुण जागीच ठार 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !