तरुणीचा महागडा मोबाईल लंपास
जळगाव : शहरातील मेहरुण येथील बंगाली गल्लीतून तरूणीचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवार, 27 मार्च रोजी सकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसात तक्रार
मेघना चैत्राम पाटील (21, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी, 27 मार्च रोजी सकाळी मेघना पाटील ह्या कामानिमित्त मेहरूण येथील महाजन नगरातील बंगाली गल्लीत गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांचा 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्यांनी परिसरात मोबाईलचा शोध घेतला. परंतू कुठेही मोबाईल आढळून आला नाही. मेघना पाटील यांनी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार महेंद्रसिंग पाटील हे करीत आहे.




