वाहतुकीस अडथळा : रावेरात 20 हातगाड्यांवर पोलिसांची कारवाई


रावेर : रावेर शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या 20 हातगाड्यांवर रावेर पोलिसांनी कारवाई केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. रावेर शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या रविवारी 20 हातगाड्यांवर रावेर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई स्टेशन रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बर्‍हाणपूर जलेबी सेंटरजवळ व रुची मोटरजवळ कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक सचिन नवेले, हवालदार भागवत धांडे, मुकेश सोनवणे यांनी ही कारवाई केली. वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरही हातगाडी चालक मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करीत असल्याने दखल घेण्याची अपेक्षा आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !