शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या निधीतून पुस्तक वाटप

रावेर तालुक्यातील 35 माध्यमिक व उच्च शाळांचा समावेश


रावेर : कमलाबाई एस.अग्रवाल गर्ल्स हायस्कूल्मध्ये शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या निधीतून रावेर तालुक्यातील 35 माध्यमिक व उच्च शाळांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष जे.के.पाटील होते.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन प्रा.प्रकाश मुजुमदार, माजी उपप्राचार्य डी.एस.चौधरी, संभाजी पाटील, कन्हैया शेठ अग्रवाल, आमदार किशोर दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरीश मुंडे कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कानडे, ललित चौधरी, रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुक्यातील पुस्तक प्राप्त शाळांतील मुख्याध्यापक, ग्रंथपाल, शिक्षक, शिक्षकेतर बंधू उपस्थित होते. जळगाव पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, चेअरमन प्रा.प्रकाश मुजुमदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शैलेश रमेश राणे तर आभार पुष्कराज मिसर यांनी मानले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !