भीषण अपघातात सात जण जागीच ठार
Accidant अमरावती : अमरावती जिल्ह्यात रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सात जण ठार झाले, तर सहा जखमी झाले. हे दोन्ही अपघात 20 किलोमीटर अंतरावर झाले. मुलगी पाहण्यासाठी जाणार्यांच्या वाहनाला समोरून येणार्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले यात एकाच कुटुंबातील दोघांचा समावेश आहे, तर दुसर्या अपघातात दोन ठार झाले.
मुलगी पहायला जाताना अपघात : पाच जागीच ठार
मृतात तवेरा चालक रोशन रमेशराव आखरे (26), प्रतिभा सुभाषराव पोकळे (50), विजय भाऊरावजी पोकळे (55 तिघेही रा. अंजनगाव बारी) कृष्णा सचिन गाडगे (8, रा. शिरजगाव कसबा) आणि गजानन दारोकर (45, रा. जरुड) अशी मृतांची नाव आहेत.


तवेराला ट्रकने उडवले
अंजनगाव बारी येथील अनिकेत सुरेशराव पोकळे याच्यासाठी शिरजगाव कसबा येथे मुलगी पाहण्याचा रविवारी कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी अंजनगाव बारी येथून पोकळे कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक दोन चारचाकी वाहनांनी शिरजगाव कसब्याकडे निघाले होते. प्रवाशांना घेऊन रोशन तवेराने शहराबाहेरून जाणार्या रहाटगाव रिंग रोडवरून जात होते.
ट्रकवर वाहन धडकले; दोघांचा मृत्यू
दुसरा अपघात सावर्डी पुलावर झाला. नागपूरहून अमरावती व अकोट येथे दूध घेऊन निघालेल्या मालवाहू वाहनाच्या चालकाला डुलकी आली व भरधाव वाहन समोर असलेल्या धावत्या ट्रकवर जाऊन धडकले. या यात राजू बाबूराव किरनाके (52) व सागर श्यामराव बाहे (28, दोघेही रा. नागपूर) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.


