भडगावात दोन दुकानांना भीषण आग : लाखो रुपयांचे नुकसान


भडगाव : शहरातील दोन दुकानांना रविवारी रात्री लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली.

व्हिडिओ व फोटो व्हायरलची धमकी देत चोपडा तालुक्यातील 25 वर्षीय विवाहितेवर अत्याचार

अचानक लागली आग
भडगाव शहरातील मेन रोडवरील आकाश मोबाईल व समर्थ लॅब या दोन दुकानांना काल रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. या दोन्ही दुकानांमधून धूर निघतांना पाहून नागरीकांनी याबाबतची माहिती दुकानांचे मालक आणि अग्नीशमन दलास दिली. आगीची माहिती मिळताच परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली तर अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.



आगीत लाखो रुपयांचे नुकसान
या आगीमध्ये आकाश मोबाईल या दुकानातील मोबाईल साहित्य, मोबाईल व मशीनसह अन्यवस्तू संपूर्ण जळून खाक झाल्या तसेच समर्थ लॅबचेही मोठे नुकसान झाले. या दोन्ही दुकान मालकांना या आगीमुळे लाखोंचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळाली नसली तरी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.

विवाहिता पडली बहिणीच्या नवर्‍याच्या प्रेमात मात्र घडले असे काही….





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !