वढोदा सरपंच चषकाचा ‘यावलचा संघ’ मानकरी
रणगावचा संघ उपविजयी : वढोदा येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा
यावल : यावल तालुका सरपंच परीषद, मुंबई महाराष्ट्र आयोजित सरपंच चषक वडोदा येथे आयोजित करण्यात आली तसेच अंतिम सामन्यात यावल येथील संघ विजयी झाला तर रणगाव संघ उपविजयी ठरला.
मान्यवरांनी दिली बक्षिसे
जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी 25 हजार पाचशे पंचावन्न रुपये तर दुसरे बक्षीस 11 हजार 111 रुपयाचे युनूस सेट पिंजारी अॅग्रो यांच्याकडून देण्यात आले तर तिसरे बक्षीस पाच हजार 555 गजानन सोनार यांच्याकडून देण्यात आले. मॅन ऑफ बेस्ट बॅटस्मॅन ऑफ सिरीज व मॅन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ सिरीज असे पारतोषिक या ठिकाणी देण्यात आले.


यांची होती उपस्थिती
अंतिम सामना शिवशक्ती सीसी क्रिकेट टीम, रणगाव व जय श्रीराम क्रिकेट टीम, यावल यांच्यात झाला. रणगाव संघाने प्रथम फलंदाजी करीत 79 रन केले तर श्रीराम टीमने चार ओव्हरमध्येच विजय मिळवला. यावेळी यावल तहसीलदार महेश पवार, यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, जिल्हा परीषदेचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, पंचायत समिती गटनेते शेखर पाटील, नितीन व्यंकट चौधरी, दीपक बेर्डे, राकेश कोलते, गणेश महाजन, युनूस शेठ पिंजारी, कबीर खान, मुकेश येवले, भरत कोळी, पराग सराफ , पप्पू जोशी, अनिल जंजाळे, गोविंद आबा पाटील, महेंद्र पाटील, गोकुळ कोळी, गोटु सोळंके, अजय अडकमोल, दीपक नेवे, शेखर पटेल, समाधान कोळी, समाधान पाटील, किरण सोनवणे, चेतन सोनवणे, सोपान सोनवणे, दिनकर सोनवणे, बबन पाटील, जगदीश सपकाळे, विकास कोळी, कैलास सपकाळे, सामाजिक कार्यकर्ता सचिन सोनवणे आदी उपस्थित होते.


