पिचडांच्या प्रवेशाने भाजपची डोकेदुखी वाढणार


मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला आहे. भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाचे आश्वासनच दिले होते. त्याप्रमाणे ते पूर्णही केले. 2014 मध्येच भाजपनेधनगर आरक्षणाचाप्रश्न मार्गी लावणार असल्याचे देखील म्हटले होते. परंतु, त्यात फारशी प्रगती झाली नाहीच. त्यात आताधनगर आरक्षणाचेकट्टर विरोधक आणि आदिवासी नेतेमधुकर पिचड आपला पुत्र वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांची मेगा भरती करून घेतली. त्यात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपच्या गळाला लागले. यापैकीच एक म्हणजे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्षमधुकर पिचड हे देखील आहेत. परंतु, पिचड पिता-पुत्र केवळ राष्ट्रवादीचे नेते म्हणूनच नव्हे तर धनगर आरक्षणाचे कट्टर विरोधक आणि आदिवासी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांची हीच ओळख भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याचे चिन्हे आहेत.


कॉपी करू नका.