चौकशीनंतर गैरव्यवहारातील सत्य समोर येणार : डॉ.सोनिया नाकाडे
रावेर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या वैयक्तिक शौचालय योजनेच्या गैरव्यवहार प्रकरणाशी आपला काहीही संबध नसल्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे म्हणाल्या. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
योजना अडकली गैरव्यवहाराच्या फेर्यात
रावेर पंचायत समितीतील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या वैयक्तिक शौचालय योजना कमालीची चर्चित आहे. तालुक्यात 2018 ते 2022 पर्यंत सुमारे 18 कोटींच्या वर खर्च झाला असून याचा तालुक्याला फारसा लाभ झालेला नाही. त्यात ही योजना गैरव्यवहाराच्या फेर्यात अडकली आहे. वैयक्तीक शौचालय योजनेबाबत तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितले की, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या वैयक्तिक शौचालय योजनेच्या गैरव्यवहार प्रकरणी माझा काहीही संबध नाही. या योजनेची चौकशी झाल्यावर सर्व सत्य समोर येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.




