पाचोर्यातील तरुणाचा महागडा मोबाईल व रोकडची जबरी लुट !
जळगाव : झाडती घेण्याच्या बहाणा करून अज्ञात दोन जणांनी तरूणाला धमकी देत खिश्यातील महागडा मोबाईल लांबवण्यासह रोकडही जबरीने काढून नेली. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
36 हजारांचा ऐवज झडतीच्या बहाण्याने लांबवला
अभिलाष रमेश येवले (28, रा.भडगाव रोड, पाचोरा) हा तरुण खाजगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवार, 28 मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पाचोरा जाण्यासाठी अभिलाष येवले हा तरुण शिरसोली नाक्यावरील नुक्कड वडापाव दुकानासमोर उीा होता. त्यावेळी दुचाकीवर अज्ञात दोन जण आले. त्यांनी झडती घेण्याच्या बहाणा करून अभिलाष येवले यांच्या खिश्यातील 30 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि सहा हजारांची रोकड जबरीने हिसकावून लांबविली. तसेच कुणाला काही सांगितले तर मारून टाकू, अशी धमकी दिली. या संदर्भात अभिलाष येवले यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून रीतसर तक्रार दिल्याने सोमवार, 28 मार्च रोजी रात्री दुचाकीवरील अज्ञात दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गिरासे करीत आहे.




