गोखले फार्मसी महाविद्यालयाचे दोघे विद्यार्थी अपघातात ठार
नाशिक : गंगापूररोडवरमंगहवारी दुपारी झालेल्या रस्ते अपघातात दोन तरुण ठार झाले आहेत. हा अपघात गंगापूररोडवरील हॉटेल गंमत-जंमत परीसरात झाला. भरधाव वेगातील मोटारसायक जोरात दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला.
दोघे विद्यार्थी जागीच ठार
अपघातील दोघे मृत झालेले तरुण हे कॉलेजरोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी होते. संकेत विजय ठाकरे (21, चेतना नगर) आणि यशराज अनिल पगार (वय 20, मखमलाबाद) अयी मयत तरुणांचे नाव आहे. या अपघातात दोन्ही तरुणांच्या डोक्याला जबर मार लागला. रस्त्यावरुन जाणार्या एका व्यक्तीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.




