अल्पवयीन मुलीचा विनयभंग
सिन्नर : शहरातील पाण्याच्या टाकीजवळील तळवाडी परीसरात अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग करीत आईवडील व भावास शिवागीळ करुन दमदाटी केल्याची घटना रविवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली.
आई-वडिलांना शिविगाळ
पीडित मुलगी पाण्याच्या टाकीजवळ, तळवाडी येथे कुटूंबासह वास्तव्यास असून याच परीसरात राहणार्या रोहित राजेंद्र बर्डे (18) याने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घराच्या पडवीत झोपलेली असताना संशयीत आरोपीने विनयभंग केला व त्याचवेळी पीडित मुलीने आरडा-ओरड केली असता तिचे आईवडील व भाऊ यांनी रोहितला जाब विचारला असता त्याने पीडितेच्या भावाला हाताच्या चापटीने मारहाण केली तसेच आईवडीलांना शिवागाळ करुन दमदाटी केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी रोहित बर्डे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धुमाळ तपास करत आहेत.




