रावेरात 6 एप्रिलपासून रंगपंचमी व्याख्यानमाला


रावेर : शहरातील रंगपंचमी व्याख्यानमालेतर्फे श्रोत्यांना 6 ते 10 एप्रिल दरम्यान दर्जेदार व्याख्यानांची मेजवानी मिळणार आहे. गेल्या 21 वर्षांची परंपरा असलेल्या या व्याख्यानमालेचे विश्वस्त आणि पदाधिकारी यांनी मंगळवारी वक्ते आणि विषय यांची घोषणा केली.

यांची होणार व्याख्याने
बुधवार, 6 एप्रिल 2022 रोजी ‘स्पर्धा परीक्षा आणि युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर बबनराव काकडे (नाशिक) पहिले पुष्प गुंफतील तर गुरुवार, 7 रोजी शिवाली देशपांडे (नागपूर) या ‘सैनिकांचे जीवन’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफतील. शुक्रवार,
8 एप्रिल रोजी गणेश शिंदे (पुणे) हे ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर तर शनिवार, 9 एप्रिल रोजी अंबरीश पुंडलिक (जळगाव जामोद) हे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ या विषयावर पुष्प गुंफतील तसेच रविवार, 10 एप्रिल रोजी शीतल मालुसरे (महाड, रायगड) या ‘तान्हाजी मालुसरे यांचा अपरीचीत इतिहास’ या विषयावर अखेरचे पुष्प गुंफतील.



श्रोत्यांना लाभ घेण्याचे आवाहन
या व्याख्यानांसाठी जैन इरीगेशन, जळगाव आणि प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील (शेंदुर्णी) यांचे सहकार्य लाभले असून ही व्याख्याने येथील सरदार जी.जी.हायस्कूलमध्ये दररोज संध्याकाळी 6:30 वाजता होतील. श्रोत्यांनी मास्क आणि सोशल डिस्टनसिंगसह उपस्थितीचे आवाहन विश्वस्त डॉ.राजेंद्र आठवले, दिलीप वैद्य, अध्यक्ष अनिल महाजन, सचिव कैलास वानखेडे आणि कार्यकारिणीने केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !