पाचोरा शहरातील किराणा दुकानदारास 15 हजारांचा ऑनलाईन गंडा
पाचोरा : शहरातील किराणा दुकानदाराची ऑनलाईन 15 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
रक्कम उकळूनही पाठवला नाही माल
ऑनलाईन मसाला विक्री करणार्या पोस्टवर संपर्क साधून 20 हजार रूपयांच्या मालाची ऑर्डर केली मात्र 15 दिवस उलटूनही माल न आल्याने संबंधितास संपर्क साधला असता त्याने पाच हजार रूपये परत केले मात्रा माल दिलाच नाही. आपली फसगत झाली हे लक्षात येताच दुकानदाराने पाचोरा पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली.


ऑनलाईन व्यवहार करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन
शहरातील मराठे शॉपिंग कॉप्लेक्समधील होलसेल किराणा दुकानाचे गणेश केसवाणी यांचा पुतन्या प्रिन्स केसवाणी याने फेसबुकवर ब्लॅकपेपर ट्रेडिंग मार्केटवर काही दिवसांपूर्वी ऑनलाईन मसाले विक्रीबाबत जाहिरात वाचली व लाईक केली. त्यानंतर प्रिन्स यास ‘6355039797’ या क्रमांकावरून फोन आला व तुम्हाला मसाले हवे आहेत का ? अशी विचारणा करण्यात आली.. बालविर इंटरप्राईज, 18 गोडावून, लक्ष्मी पेट्रोलपंपासमोर, जेटपुर हायवे, साबलपूर,जुनागड हा आमचा पत्ता असून बँक ऑफ बडोदा या बॅकेच्या ‘5868010000264’ या क्रमांकावर पैसे पाठवून मालाची ऑर्डर करण्याचे सांगीतले. प्रिन्स याने 9 हजार किंमतीचे 180 रुपये किलो दराने 50 किलो जिरे, 11 हजार 500 रुपये किंमतीचे 460 किलो दराने 25 किलो मीरे अशी एकूण 20 हजार 500 रुपयांची ऑर्डर दिली तसेच आणि पेमेंटही पाठवून दिले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिली तक्रार
ऑर्डर टाकून बराच कालावधी झाला मात्र माल आला नाही म्हणून फोन करून चौकशी केली असता सुरूवातीला उडवा उडवीची उत्तरे मिळाली. नंतर वाद वाढत गेला त्यावेळी बालविर इंटरप्राईजकडून 4 हजार 990 रूपये खात्यावर परत केले माञ उर्वरित पैसे अथवा माल न पाठवल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच प्रिन्सचे काका गणेश केसवाणी यांनी पाचोरा पोलीसामध्ये तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील हे तपास करित आहेत.


