कोळवद शिवारातील शेतातील केळीचे 300 घड कापले : एकाविरोधात गुन्हा
यावल : तालुक्यातील कोळवद शिवारातील शेतातून 300 केळीचे घड कापून नुकसान केल्याची घटना समोर आली असून एकाविरोधात मंगळवारी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात गुन्हा
यशवंत टोपा महाजन (कोळवद, ता.यावल, ह.मु.भुसावळ) यांचे यावल तालुक्यातील कोळवद शिवारात शेत गट नंबर 78 मध्ये शेत आहे. त्यांच्या शेतात त्यांनी 300 केळी खोड लावले असून सोमवार, 28 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास संशयीत उद्धव टोपा महाजन (रा.समर्थ कॉलनी, एम.जे.कॉलेजसमोर, जळगाव) याने त्यांच्या शेतातील 300 केळीचे खोडसह कापणीवर आलेले केळी कापून एक लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करीत शेतकर्याने तक्रार दिल्यानंतर महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक राजेंद्र पवार करीत आहे.




