आधी प्रेम नंतर झाले वाद : तरुणाने पेटवून घेत तरुणीला ओढले
नवी दिल्ली : एकमेकाच्या प्रेमात बुडालेल्या प्रियकर-प्रेयसी झालेल्या वादानंतर संतप्त प्रियकराने स्वतःला पेटवून घेतले व नंतर आपल्या प्रेयसीला ओढून घेतल्याने दोघे गंभीर जखमी झाले. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ही घटना घडली. दोघेही यात घटनेत गंभीर भाजले गेले आहेत. सध्या दोघांवरही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोघेही मूकबधीर आहेत आणि दोघांची ऑनलाइन ओळख झाली होती. हळूहळू ही मैत्री वाढली आणि दोघे प्रेमात पडले.
पेटवून घेत तरुणाने तरुणीला ओढले
कानपूरच्या नौबस्तामध्ये राहणारा राम नारायणची मूकबधीर मुलगी रचनाची ऑनलाइन मैत्री जयपूरच्या विजयसोबत झाली होती. दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. पण काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. आज सकाळी विजय जयपूरहून कानपूरला आला आणि अंगावर पेट्रोल ओतून घेत रचना घरात शिरला. त्यानंतर विजयने स्वत:ला पेटवून घेतलं. आग लागल्यानंतर त्याने रचनाला जवळ घेतलं, ज्यामुळे ती सुद्धा भाजली गेली. दोघेही आगीत जळत असल्याचं पाहून तिथे एकच गोंधळ उडाला. त्यांना बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली. दोघांना जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दोघांचीही स्थिती गंभीर आहे.


तरुणाविरोधात गुन्हा दाखल
राम नारायण म्हणाला की, आज सकाळीच विजय जयपूरहून आला होता आणि त्याने घरात आल्यावर स्वत:ला आगीच्या हवाली केलं. डीसीपी रवीना त्यागी यांनी सांगितलं की, दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तरूण जास्त भाजला गेलाय, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


