भुसावळ शहर पोलिसांच्या हातावर तुरी देत चोरीतील आरोपी जळगावातून पसार


भुसावळ : भुसावळ शहर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी ट्रान्सफर वारंटमध्ये ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्याची घटना बुधवारी सायंकाळी जळगाव शहरातील जैन इरीगेशनजवळ घडल्याने मोठी खळबळ जिल्ह्यात उडाली आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला. राजू विक्रम खांडेलकर (20, रा.महालखेडा, ता.मुक्ताईनगर) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

मेहकरमधील उपविभागीय कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी 

पोलिसांच्या तावडीतून आरोपी झाला पसार
भुसावळ शहर पोलिसात गुरनं. 41/2022, भादवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातीळ आरोपी नराजू विक्रम खांडेलकर (20, रा.महालखेडा, ता.मुक्ताईनगर) यास ट्रान्सफर वॉरंट घेऊन धुळे जिल्हा कारागृहातून पोलीस नाईक जाकिर मंसुरी, पोलीस नाईक विकास बाविस्कर व सहायक फौजदार रशीद तडवी हे ताब्यात घेऊन भुसावळ येथे बुधवारी सायंकाळी आणत होते मात्र जैन इरीगेशन कंपनी, जळगाव (धरणगाव पोस्ट हद्द) आल्यानंतर पोलिसांच्या हाताला झटका मारत आरोपीने चालत्या वाहनातून उडी टाकून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलीस कर्मचारी देखील भांबावले व त्यांनी काही अंतरापर्यंत आरोपीचा पाठलाग केला मात्र रात्रीच्या अंधारात आरोपी गायब झाल्याने रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, पोलिसांच्या तावडीतून आरोपी पसार झाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



धक्कादायक : धडापासून शीर वेगळे करीत पूजार्‍याची निर्घृण हत्या 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !