मध्यरात्री महिलेचा विनयभंग : आरोपीला अटक


जळगाव : जळगाव शहरातील एका भागात राहणार्‍या महिलेचा विनयभंग करून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी संशयीत आरोपीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्री महिलेचा विनयभंग
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात 32 वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांचा वास्तव्याला आहे. त्या खासगी कंपनीत नोकरीला आहेत. 30 मार्च रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव हा महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करत दरवाजा ठोठावला. महिला दरवाजा उघडून बाहेर आल्या असता मंगलसिंग याने तिचा हात पकडला व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. यात महिलेने त्याला ढकलले याचा राग आल्याने मंगलसिंग जाधव याने महिलेला लाथ मारून पळ काढला. यावेळी महिलेचा जेठ यांनी संशयीतास पकडण्याचा प्रयत्न केला आता त्यांनाही ढकलून पसार झाला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



भुसावळ शहर पोलिसांच्या हातावर तुरी देत चोरीतील आरोपी जळगावातून पसार 

या कर्मचार्‍यांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय बडगुजर, सतीश गरजे यांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

अट्टल दुचाकी चोरटा अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात

 

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !