सेवानिवृत्तीच्या दिवशी लाचखोरीचा डाग : शिरपुरातील गटविकास अधिकार्‍यासह सहा.लेखाधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात

पाच हजारांची लाच भोवली : पंचायत समितीतच सापळा यशस्वी


Dhule ACB Trap at Shirpur धुळे : पाच हजारांची लाच मागणे शिरपूर गटविकास अधिकार्‍यांच्या चांगलेच अंगलट आले असून त्यांच्यासह सहाय्यक लेखाधिकार्‍यांच्या धुळे एसीबीच्या पथकाने लाच (bribe) स्वीकारताच मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे शिरपूर पंचायत समितीच्या दालनातच गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा सापळा यशस्वी करण्यात आला तर गुरुवार, 31 मार्च गटविकास अधिकारी सेवानिवृत्त होत असतानाच त्यांच्यावर लाचखोरीचा शिक्का बसून त्यांना अटक करण्यात आली. युवराज दलाल शिंदे (58, रा.आनंदनगर, प्लॉट नं 6, इंदिरा गार्डन जवळ, युगंधार बिल्डिंगसमोर, देवपूर, धुळे) असे अटकेतील लाचखोर गटविकास अधिकार्‍यांचे तर चुनीलाल गोपीचंद देवरे (44, रा.प्लॉट नंबर पाच, राजेश्वर नगर, एकवीरा शाळेजवळ, देवपूर, धुळे) असे अटकेतील सहाय्यक लेखाधिकार्‍याचे नाव आहे.

पाच हजारांची लाच मागणी भोवली
44 वर्षीय तक्रारदार हे प्राथमिक शिक्षक असून त्यांनी घराच्या दुरुस्तीकामी भविष्य निर्वाह निधीच्या जमा रक्कमेतून ना परतावा पाच लाख रुपये अग्रीम मंजूर होण्यासाठी शिरपूर गटविकास अधिकार्‍यांची भेट घेतली होती. हे काम करून देण्यासाठी आरोपी गटविकास अधिकार्‍यांनी पाच हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीशी संपर्क साधून तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पंचायत समितीत सहाय्यक लेखाधिकारी चुनीलाल देवरे यांनी लाच स्वीकारली व ती गटविकास अधिकार्‍यांच्या सांगण्यावरूनच स्वीकारली असल्याने दोघांना लागलीच अटक करण्यात आली.



यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर (Dhule acb dysp anil badgujar) यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, शरद काटके, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे,संतोष पावरा ,संदीप कदम,महेश मोरे, संतोष पावरा, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

मध्यरात्री महिलेचा विनयभंग : आरोपीला अटक 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !