भरधाव कारची धडक : धरणगावातील दुचाकीस्वार ठार


Dharangaon Accidant धरणगाव : भरधाव कारच्या धडकेत धरणगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात धरणगाव तालुक्यातील भोणे गावाजवळ घडला. याबाबत धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सुरेश भिकाजी सोनवणे (49, पारधीवाडा, धरणगाव) असे मयताचे नाव आहे.

भोणे गावाजवळ अपघातात मृत्यू
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश भिकाजी सोनवणे (49, रा. पारधीवाडा, धरणगाव) हे मुंबई येथील गांधी बालविद्या मंदिर, कोहिनूर सीटी, कुर्ला येथे कला शिक्षक म्हणून नोकरीला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाल्याने ते धरणगाव येथे आलेले होते. दरम्यान, सुरेश सोनवणे हे गुरूवारी 31 मार्च रोजी कामाच्या निमित्ताने दुचाकीने दुपारी 12 वाजेच्या सुमारास भोणे गावाच्या दिशेने जात होते. पांडूरंग सातपुत यांच्या शेताजवळ अचानक भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुरेश सोनवणे हे जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, वडील, भाऊ असा परीवार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !