कवठळला चोरट्यांनी दिड लाखांचे दागिने लांबवले
धरणगाव : तालुक्यातील कवठळ येथे मध्यरात्री उघड्या घरातून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 32 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरपुरातील लाचखोर गटविकास अधिकार्यासह सहा.लेखाधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात
उघड्या घरातून लांबवला ऐवज
सुनील बाबुराव पाटील (40, रा.कवठळ, ता.धरणगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. 28 मार्च रोजी रात्री ते जेवण करून कुटुंबीयांचा झोपले होते. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. उघडा दरवाजा पाहून अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून कपाटातून 67 हजार 400 रुपये आणि 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 32 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सकाळी 6 वाजता उठल्यानंतर लक्षात आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन महाजन करीत आहे.




