बंद घर चोरट्यांना पर्वणी : 39 हजारांच्या ऐवज लांबवला
जळगाव : शहरातील नूतन वर्षा कॉलनीतील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोकड मिळून 39 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रुती श्रीकृष्ण मुजुमदार (60, रा.नूतन वर्षा कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. 12 मार्च रोजी त्या घर बंद करून कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घर बंद पाहून संधी साधत घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीच्या मुर्त्या व शिक्के आणि 16 हजार रुपयांची रोकड असा एकूण 39 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार 21 मार्च रोजी सकाळी 10 वाजता त्या घरी आल्यावर उघडकिला आला.




