इंधन दरवाढीच्या निषेधार्थ यावलमध्ये काँग्रेसचे आंदोलन
यावल : केंद्रातील भाजप सरकारने वाढविलेल्या इंधन दरवाढच्या विरोधात शुक्रवार, 1 एप्रिल रोजी यावल पोलीस ठाण्याच्या समोर यावल काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करीत मोदी सारकारचा जाहीर निषेध केला.
अर्थहीन शासन कारभारामुळे देश वेठीस
केंद्र सरकारने पाच राज्यात निवडणूक सुरू असतांना पेट्रोल- डिझेल व गॅस यांची दरवाढ केली आहे. ही दरवाढ सर्वसाधारण व्यक्तींचे कंबरडे मोडले आहे. बेजबाबदार व अर्थहीन शासन कारभाराने संपूर्ण देशाला वेठीस धरले असून जिवनावश्यक वस्तूंपासून ते पेट्रोल-डीझेल, गृहणीचे स्वंयपाक गॅस या प्रत्येक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्या आहे. या महागाईच्या विरोधात यावल पोलीस ठाण्याच्या आवारात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.


यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरुड, माजी नगरसेवक अस्लम शेख नबी, माजी नगरसेवक समीर शेख मोमीन, माजी नगरसेवक गुलाम रसुल, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, राहुल तायडे, विलास अडकमोल, अजय अडकमोल, संदीप सोनवणे, काँग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, पंचायत समितीचे मावळते सदस्य सरफराज तडवी, पुंडलीक बारी, संगोयोचे माजी अध्यक्ष खलील शाह यांच्यासह आदी पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.
लोकगीतांनी वेधले लक्ष
यावल पोलीस स्टेशन समोर सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या महागाईमुक्त धरणे आंदोलनास यशस्वी करण्यासाठी काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्यासह पक्षाच्या सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. यावेळी महागाईच्या विषयावर वढोदे येथील श्री दुर्गामाता महीला भजनी मंडळीने जनजागृतीपर लोकगीत सादर करून जनतेचे लक्ष वेधले. आंदोलनानंतर शुक्रावरी दुपारी चार वाजता मोदी शासनाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे.
पारोळा तालुक्यातील अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार


