जळगावात दुकान फोडले : 45 हजारांचे कपडे लंपास


जळगाव : शहरातील गांधी मार्केटमधील कपड्यांचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून 45 हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल लांबवला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एस.टी.धावणार आता पूर्ण क्षमतेने : एस.टी. महामंडळात होणार मेगाभरती

कपड्याच्या दुकानात चोरीने उडाली खळबळ
स्वप्निल संजय भोई (20, रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांचे महात्मा गांधी मार्केट येथे फंकी बॉईज नावाचे कपड्याचे दुकान आहे. गुरुवार, 31 मार्च रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी सहा वाजता दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान, शुक्रवार, 1 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान फोडल्याची माहिती मिळाली. त्यावर त्यांनी तातडीने गांधी मार्केट येथे येऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी शटरची खालची पट्टी तोडून आत प्रवेश करत जीन्स पॅन्ट, शर्ट, टी-शर्ट आदी वस्तू चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. यामध्ये एकूण 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.



शहर पोलिसांची घटनास्थळी धाव
याबाबत शहर पोलिसांना कळविण्यात आले. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत स्वप्निल भोई यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास शहर पोलिस कर्मचारी करीत आहे.

शहादा तालुक्यातील डोंगरगाव शिवारात दोघा युवकांची गळफास घेत आत्महत्या 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !