शिरपूरातील लाचखोर बीडीओसह सहाय्यक लेखाधिकार्‍याची पोलिस कोठडीत रवानगी


धुळे : शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी युवराज दलाल शिंदे (58, रा.आनंदनगर, प्लॉट नं 6, इंदिरा गार्डन जवळ, युगंधार बिल्डिंगसमोर, देवपूर, धुळे) व सहाय्यक लेखाधिकारी चुनीलाल गोपीचंद देवरे (44, रा.प्लॉट नंबर पाच, राजेश्वर नगर, एकवीरा शाळेजवळ, देवपूर, धुळे) यांना गुरुवारी दुपारी धुळे एसीबीने पाच हजारांची लाच घेताना अटक केली होती. विशेष म्हणजे 31 मार्च रोजी युवराज शिंदे हे सेवानिवृत्त होणार होते व दोन तासांनी त्यांना निरोप देण्यात येणार होता व त्यासाठीची लगबग सुरू असतानाच एका शिक्षकाकडून पाच हजारांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आल्याने लाचखोरांच्या गोटात घबराट निर्माण झाली होती. दोघा आरोपींना शुक्रवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पाच हजारांची लाच मागणी भोवली
44 वर्षीय तक्रारदार हे प्राथमिक शिक्षक असून त्यांनी घराच्या दुरुस्तीकामी भविष्य निर्वाह निधीच्या जमा रक्कमेतून ना परतावा पाच लाख रुपये अग्रीम मंजूर होण्यासाठी शिरपूर गटविकास अधिकार्यांची भेट घेतली होती. हे काम करून देण्यासाठी आरोपी गटविकास अधिकार्यांनी पाच हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीशी संपर्क साधून तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पंचायत समितीत सहाय्यक लेखाधिकारी चुनीलाल देवरे यांनी लाच स्वीकारली व ती गटविकास अधिकार्यांच्या सांगण्यावरूनच स्वीकारली असल्याने दोघांना लागलीच अटक करण्यात आली.



बोदवड तहसीलदारांसह चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !