शिरपूर पोलिसांनी एक लाखांचा गुटखा केला जप्त
शिरपूर : नाकाबंदीदरम्यान दुचाकीस्वाराच्या ताब्यातून एक लाखांचा गुटखा व 30 हजाराची दुचाकी जप्त करण्यात आली. पंकज दिलीप पवार (वय 25 रा.महाविर लॉन्स, करवंद रोड, शिरपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
नाकाबंदी दरम्यान कारवाई
शिरपूरचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, एपीआय गणेश फड, पअमित रनमळे, स्वप्निल बांगर, सनी सरदार, रवि महाले यांच्या पथकाने मध्यरात्री करवंद नाका येथे ऑल आऊट दरम्यान नाकाबंदी करीत संशयीत वाहनांची तपासणी सुरू केली. तेव्हा एक वाजेच्या सुमारास एका संशयीत दुचाकीस्वाराला (क्र.एमपी 46 एमएच 9823) पकडण्यात आले. त्यांच्याकडील पिशव्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला. संशयीताकडून एकूण एक लाख 620 रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला व मानवी शरीरावर अपायकारक असलेला विमल पान मसाला व व्ही.1 तंबाखूचा साठा व 30 हजारांची दुचाकी जप्त करण्यात आली.




