स्वस्तात कॉपर केबल देण्याच्या आमिषाने लुटणारी टोळी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
धुळे : स्वस्तात कॉपर केबल खरेदीसाठी बोलावत पुण्यातील बिल्डरला लुटण्यात आले होते. या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. साडेपाच लाखांची रोकड व मोबाईल असा सहा लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
बोदवड तहसीलदारांसह चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात
पुण्यातील बिल्डरला लुटले
पुणे येथील रीअल इस्टेट व्यावसायीक दसमेल सुखविंदर कालरा यांना 27 मार्च रोजी सागर पाटील, महेश पाटील व राजेंद्र पाटील यांनी त्यांचे इतर साथीदारांसह कॉपर केबल घेण्यासाठी छडवेल शिवारातील सुझलॉन कंपनीच्या पाठीमागे पैश्यासह बोलावले होते मात्र आरोपींनी यावेळी मारहाणी करीत त्यांच्याकडील 40 लाखांची रोकड बरदस्तीने हिसकावत पळ काढला होता. याबाबत निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल होता.


गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
संशयीत नवरत पवार याने सागर पाटील असे बनावट नावाचे फेसबुक खाते तयारी करीत त्यावर कॉपर वायरचे फोटो टाकुन कॉपर वायर विकण्यासाठी संपर्क क्रंमाक देवून कालरा यांना खरेदी करण्यासाठी आकर्षित केले. इकबाल चव्हाण (बनावट नाव राजेंद्र पाटील), कृष्णा भोसले (बनावट नाव महेश पाटील) व इतर साथीदार यांचे मदतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हयाचा समांतर तपास करतांना वरील आरोपींनी बारडोली येथुन कार मेळाव्यातुन शेवरले कंपनीची कार (क्र. जी.जे. 19 ओ.एम.-406) कार खरेदी करुन राजस्थान राज्यात पळुन गेले असल्याची गोपनिय माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी एपीआय प्रकाश पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सुर्यवंशी यांचे वेगवेगळे पथक नेमुन आरोपींचा शोध सुरू केला होता.
तसेच पथकाकडुन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या (उेपषळवशपींळरश्र
अखेर आरोपी जाळ्यात
आरोपी कारने चोपडा येथून शिरपूरकडे येत असताना शुक्रवार, 1 रोजी 11 वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर गावापुढे असलेल्या चोपडा फाट्यावरील हॉटेल सहास येथे सापळा रचला. संबधित कार आल्यानंतर संशयीत इकबाल जाकीट चव्हाण (रा.जामदा, ता.साक्री), कृष्णा अशोक भोसले (रा.जामदा, ता.साक्री), नुरआलम महोम्मद युसूफ सैय्यद (रा.घर नं. 57, ग.नं. 2, मारोती नगर, लिंबायत सुरत, गुजरात) यांना अटक करण्यात आली तर पाच लाख 47 हजार रुपये रोख व 55 हजार 999 रुपये किंमतीचे पाच मोबाईल मिळून सहा लाख दोन हजार 999 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांना पुढील तपासासाठी निजामपुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, आरोपींनी यापूर्वी अनेकांना गंडवल्याचा संशय आहे
यांनी आवळल्या टोळीच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, एपीआय प्रकाश पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सुर्यवंशी, संजय पाटील, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, प्रकाश सोनार, संदीप सरग, कुणाल पानपाटील, रविकिरण राठोड, उमेश पवार, योगेश चव्हाण, राहुल सानप, गौतम सपकाळे, चेतन कंखरे, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, मयुर पाटील, किशोर पाटील, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, अमोल जाधव, चालक विलास पाटील, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.
भुसावळात गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसांसह आरोपी जाळ्यात


