औषधांची नशेसाठी केली विक्री : एकाला अटक


धुळे : शहरातील शब्बीर नगरात औषधांची नशेसाठी चोरटी विक्री करु पाहणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याचा सहकारी पसार झाला. मध्यरात्री ही कारवाई झाली. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औषधांची नशेसाठी विक्री
शब्बीर नगरातील एका गॅरेजजवळ थांबलेला तरुण औषधांची नशेसाठी विक्री करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून अजोद्दीन शफीओद्दीन शेख (33, रा. आझाद नगर, वडजाई रोड) याला ताब्यात घेतले. त्याचा सहकारी अकबर जलेला उर्फ अली कैसर अली शहा (रा.शब्बीर नगर) हा पसार झाला. पोलिसांनी या कारवाईत औषधांच्या 40 बाटल्या जप्त केल्या आहे.



चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा
मध्यरात्री दीड वाजता या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक नासीर पठाण तपास करत आहे. या प्रकरणातील संशयित अकबरला शुक्रवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

नाशिक विभागातील सर्वात मोठी कारवाई : भुसावळात तीन कंटेनरमधून दोन कोटी 27 लाखांचा गुटखा जप्त





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !