खरेदीच्या बहाण्याने सराफा व्यावसायीकास गंडा घालणार्या महिलेला अटक
तळोदा : खरेदीच्या बहाण्याने सराफा चौक परिसरात असलेल्या बिजासन या ज्वेलर्स दुकानात अज्ञात महिलेने नाकातील सोन्याची नथ शिताफीने लांबविली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
नथ टाकली तोंडात
तळोदा येथे गुरुवारी सायंकाळी मेनरोड वरील ओम ज्वेलर्समध्ये महिलेने नाकातील नथ दाखवा असे सांगितलेे व पाहता-पाहताच शिताफीने नथ तोंडात टाकली. दुकान मालकाने सीसीटीव्ही चेक केल्याने हा प्रकार लक्षात आला. दुकानदाराने पोलीस ठाण्याची धमकी दिल्यानंतर संबधित महिलेने ती नथ परत केली. त्यानंतर ती महिला बिजासान ज्वेलर्स या दुकानात गेली. दरम्यान याठिकाणी देखील अश्याच पद्धतीने चोरी करण्याचा प्रयत्न तिने केला. मालक निलेश सोनार यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता या महिलेने पाहणी दरम्यान 400 मिलीग्रॅम वजनाची सोन्याची नाकाची नथ तोंडात टाकल्याची त्यांचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी घटना पोलिसांना कळवली.




