शिविगाळचा जाब विचारताच माय-लेकींवर चॉपरने हल्ला : जळगावात गुन्हेगारी ऐरणीवर
जळगाव : शिविगाळ करीत असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेसह तिच्या मुलावर चॉपर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मटण मार्केट जवळ घडली आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात करण्यात आले. मुनकाबाई बिर्हाडे (40) आणि मंगल सचिन बिर्हाडे (20) अशी जखमींची नावे असून दीपक गायकवाड असे संशयीताचे नाव आहे.
माय-लेकींवर केला हल्ला
याबाबत माहिती अशी की, शहरातील मटन मार्केट जवळील असलेल्या वसाहतीमध्ये मुनकाबाई या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शुक्रवारी 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.15 वाजेच्या सुमारास एका संशयीताने शिविगाळ केली व जाब विचारण्यासाठी मनूकाबाई या गेल्या असता संशयीताने त्यांच्या डोक्यावर चॉपरने वार करून जखमी केले. दरम्यान, आईवर वार झाल्याने त्याला अडविण्यासाठी गेलेला त्यांचा मुलगा मंगला याच्यावर देखील संशयीत दीपकने वार करीत जखमी केले. दोघांवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.




