14 वर्षीय मुलीचा 32 वर्षीय तरुणासोबत विवाह
कोल्हापूर : कोल्हापुरात 14 वर्षीय मुलीचा 32 वर्षीय तरुणाशी विवाह लावून दिल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही कुटुंबीयांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवीतील मुलीचा विवाह लावल्याचे उघड
कोल्हापूरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणार्या 14 वर्षीय मुलीचा विवाह सांगोल्याच्या सोमनाथ संजय भडंगे याच्याशी होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सुरुवातीला पुरावे गोळा केले. मुलीच्या पालकांकडे चौकशी केली असता त्यांनी केवळ साखरपुडा झाल्याचे सांगितले. मात्र, प्रत्याक्षात मुलीचा विवाह लावण्यात आला होता. याप्रकरणी हसूरकर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर राहुल रेखावार यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे प्रकरण उघडकीस आणले.


यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
याप्रकरणी मुलीचे आई, वडील मोनिका सागर हत्तेकर, सागर भैरू हत्तेकर, मुलांचे आई-वडील प्रियंका भडांगे, संजय भडंगे व सोमनाथ संजय भडांगे यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 14 वर्षीय मुलीचा 32 वर्षीय तरुणाशी विवाह लावून दिल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.


