कोळसा टंचाईमुळे दीपनगरातील संच क्रमांक तीन बंद


भुसावळ : एकीकडे तापमानामुळे राज्यभरात विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजनिर्मिती गरजेची असल्याच्या काळातच कोळसा टंचाईमुळे दीपनगरातील 210 मेगावॅटचा संच क्रमांक 3 बंद आहे. सध्या 1 हजार मेगावॅटच्या दोन्ही संचांतून राज्याला केवळ 800 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. कोळसा टंचाई कायम असली तरी दररोज उपलब्ध होणार्‍या कोळशातून तिन्ही संच चालवून राज्याला अधिकाधिक विजेचा पुरवठा करण्याची गरज आहे. मात्र, कोळसा टंचाईमुळे स्थानिक प्रशासनाने दीपनगरातील संच क्रमांक 3 बंद केला आहे. सध्या संच क्रमांक 4 व 5 मधून राज्याला केवळ 800 मेगावॅट वीज मिळत आहे. राज्यात तापमान वाढीचे उच्चांक नोंदवले जात असल्याने सर्व क्षेत्रातून विजेची मागणी वाढली आहे. या काळात दीपनगर केंद्रातून किमान 1100 मेगावॅट वीजनिर्मिती होणे अपेक्षित आहे. या तुलनेत केवळ 800 मेगावॅट एवढीच वीज निर्मिती होत आहे.

निकृष्ट कोळसा पूर्ण क्षमतेने वीज निर्मितीत अडसर
वीजनिर्मिती केंद्रात दररोज कोळसा उपलब्ध होत असला तरी त्यात निकृष्ट कोळशाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे अधिक कोळसा वापरुन देखील पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत नाही. त्यामुळे उष्मांक वाढवून अधिक वीजनिर्मितीसाठी आयात कोळशाचा वापर गरजेचा आहे. मात्र, दीपनगरात आयात कोळसा देखील वापरला जात नाही.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !