Eknatharav Khadse बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरण ; माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी नोंदवला जवाब
Eknatharav Khadse मुंबई : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknatharav Khadse) यांना मुंबई पोलिसांनी गुरुवारी हजर राहण्यास सांगितल्यानंतर गुरुवारी खडसे यांनी कुलाबा पोलिसात जवाब नोंदवला.
फोन टॅपिंग प्रकरणात माजी खडसे स्पष्टच म्हणाले ; 40 वर्ष निष्ठेने काम करणार्या भाजपाच्या काळातील सर्वात दुर्दैवी प्रकार
रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा
वरीष्ठ पोलिस अधिकारी राजीव जैन यांच्या तक्रारीवरून शुक्ला यांच्या विरोधात मार्च महिन्यात कुलाबा पोलिस ठाण्यात कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. . शुक्ला यांनी भाजपचे माजी नेते आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या फोन नंबरवर पाळत ठेवल्याचा आरोप जैन यांनी केला होता. खडसे (Eknatharav Khadse) यांना गुरुवारी दक्षिण मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आल्यानंतर गुरुवारी दुपारी खडसे (Eknatharav Khadse) यांनी आपला जवाब नोंदवला.





कुलाबा पोलिसात दाखल आहे गुन्हा
दक्षिण मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी असलेल्या रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांनी निहित राजकीय स्वार्थासाठी 2019 मध्ये या दोन नेत्यांचे फोन टॅप (Phone Tap) केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी खडसे भाजपचे सदस्य होते. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्ला यांना पुण्यात दाखल झालेल्या अशाच एका प्रकरणात अटकेतून सूट दिली आहे. शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये अतिरीक्त पोलीस महासंचालक (केंद्रीय राखीव पोलीस दल) या पदावर केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. अतिरीक्त पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्याच्या तक्रारीच्या आधारे, शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरुद्ध बंड गार्डन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.
