ऑनलाईन फसवणुकीचा नवीन प्रकार : फ्लिपकार्ट वॉलेटवरून परस्पर 30 हजारांची खरेदी
जळगाव : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडत असताना फसवणुकीचा नवीन प्रकार समोर आला आहे. जळगावातील तरुणाच्या फ्लिपकार्ट वॉलेटवरून परस्पर खरेदी करीत ऑनलाईन 29 हजार 797 रुपयांत फसवणूक करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. याबाबत रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेजारचे भांडण सोडवणे पडले महागात : प्रौढाच्या डोक्याला दुखापत
तरुणाला ऑनलाईन गंडा
त्र्यंबक नगरातील विश्वजीत अपार्टंमेंटमध्ये तेजेश्वरराव गोकूळ पाटील (32) हे वास्तव्यास आहेत. तेजेश्वरराव यांच्या फ्लिपकाटर्र्च्या वॉलेटवरुन भामट्याने परस्पर तब्बल 29 हजार 797 रुपयांची खरेदी केली. 2 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी ददोन वाजेच्या सुमारास संबंधितांनी ही खरेदी केल्याची बाब समोर आली असून फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर तेजेश्वरराव यांनी बुधवार, 20 एप्रिल रोजी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहेत.




