महिलेसह चार नक्षलवादी गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात
गडचिरोली 18 लाखांचे बक्षीस असलेल्या व एकूण 27 गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या चार नक्षलवाद्यांना पकडण्यात आले आहे. भामरागड पोलिस उपविभागांतर्गत धोडराज पोलिस मदत केंद्रात येणार्या नेलगुंडा गावालगत गडचिरोली पोलिसांच्या विशेष नक्षलविरोधी अभियान पथकाने गुरुवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे एका महिला नक्षलवाद्यासह चार नक्षलवाद्यांना अटक केल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अंकुश गोयल यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.
एकही गोळी व्यर्थ न दवडता कारवाई
या कारवाईत दोन्ही बाजूकडील बंदुकीची एकही गोळी व्यर्थ न दवडता अटक केली. कारण सर्व नक्षलवादी साध्या पेहरावात असून त्यांच्याकडे बंदुका नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनाही बंदुकांचा वापर करावा लागला नाही. ही पोलिसांची उल्लेखनीय कारवाई असल्याचे गोयल म्हणाले.


यांना केली अटक
अटक करण्यात आलेल्या नक्षलीची नेलगुंडा निवासी बापू उर्फ रामजी वड्डे, त्याची पत्नी सुमन कुडीयामी, मारोती गावडे, अजित उर्फ भरत अशी नावे असून सर्व गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
राज्यातील भारनियमनाबाबत ऊर्जामंत्र्यांनी केली ही घोषणा


