पाचोरा तालुक्यातील 24 वर्षीय विवाहितेवर अत्याचार : दोन आरोपींना अटक
Pachora Taluka Balatkar पाचोरा : बकरीसाठी चारा आणण्यासाठी बाहेर पडलेल्या 24 वर्षीय विवाहितेवर अत्याचार (Pachora Taluka Balatkar) करण्यात आल्याची घटना पाचोरा तालुक्यातील एका गावात घडली. आरोपीने पीडीतेच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला तर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे ठार मारू अशी धमकी संशयीत आरोपींनी देत विवाहितेच्या पतीला मारहाण केली. या प्रकरणी आठ आरोपींविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत अनिल देविदास काळे व संदीप जाधव या दोघांना अटक करण्यात आली.
मुलाला मारण्याची धमकी देत केला अत्याचार
24 वर्षीय महिला ही बकरीसाठी चारा आणण्यासाठी बाहेर गेली असता संशयीत नितीन एकनाथ जाधव याने पीडीत महिलेस तिच्या मुलाला मारण्याची धमकी देत जबरदस्ती अत्याचार (balatkar) केला. या अत्याचाराबाबत पीडीत महिलेने आपल्या पतीस सांगितल्यानंतर महिलेच्या पतीने संशयीत नितीन जाधव यास याबाबत विचारले असता त्याने शिविगाळ केली तसेच मंगळवार, 19 एप्रिल 2022 रोजीच्या संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अनिल काळे, संदीप जाधव आणि एका महिलेने पीडीतेच्या घरात घुसून शिवीगाळ करुन माराहाण केली तसेच पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. एव्हढेच नव्हे तर अनिल काळे याने पीडीत महिलेस शारीरीक संबंध करुन दे, असे सांगुन साडी ओढली तर संदीप जाधव याने पीडीतेचा विनयभंग केला तसेच नितीनचा पाहुणा भरत याने तिला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.




